चातकाच्या तृषार्त.... हल्ली हेच पाहीजे,

'नाही पैसा नाही बळ
नकाच सांगू प्रारब्ध
उभारतील मनाला
प्रेमाचे ते दोन शब्द

डोकाउन अंतरात
सापडतील ते शब्द
मनाची साद मनाला
उमटवील ते शब्द

उचंबळूनी ते येता
होतेच प्रेम निःशब्द
कधी अश्रू कधी स्पर्श
बनतील तेच शब्द...'