आवडले. सह्याद्रीचे डोंगर... पावसाच्या स्पर्शाने कसे सवत्स धेनूच्या भरदार कासेसारखे दिसू लागतात!
मागे एकदा औंधच्या गडावर जाण्याचा योग आला होता. अचानक वळवाचे काहूर आणि वारा सुरू झाला, तेव्हा घाईघाईने गड उतरावयास सुरुवात केली... उपयोग झाला नाही... गडगडाटासह कोसळणाऱ्या पावसाने आम्हाला पावन करून घेतले. त्यावेळी संग्रहालय पाहायचे राहून गेले. पुढे पुन्हा गेलो, तेव्हा ते पाहिले. पंतप्रतिनिधींनी चितारलेले 'चित्ररामायण' राजवाड्यातील यमाई मंदिरात पाहिले. सुंदर...