१)१०% अध्यात्मभाव आणि ९०% थ्रिल किंवा 'चला करून पाहू या' किंवा 'आम्ही वारीही केली'. (आमचे अंदमान झाले, मॉरिशस झाले, वारीही झाली).
२) धकाधकीतून विरंगुळा म्हणून नक्कीच नाही.
३)बहुतेक नाही.
४) शक्यता फार कमी.
माझे असे मत आहे की आज वारीत जो ग्रामीण शेतकरीवर्ग प्रामुख्याने दिसतो त्याचे येत्या साठसत्तर वर्षांत उन्नयन होईल. शेतीतच सुबत्ता तरी येईल किंवा शेतीवरचे अवलंबित्व कमी होऊन आर्थिक स्थिती सुधारेल. यापैकी काहीही घडले तरी पुढच्या पिढ्यांचे जीवनमान बदलेल. घरे मोठी होतील, घरांत स्वच्छतागृहे असतील,वारीतली अस्वच्छता टोचू लागेल आणि(नोकरीधंद्यामुळे) एकेक महिना वारीला देण्याइतका वेळही मिळणार नाही. वारी करण्याची आध्यात्मिक निकड भासेनाशी होईल. लोकांचा भोळेभाबडेपणा , गतानुगतिकत्व कमी होऊन ते अधिक प्रॅक्टिकल बनतील.
हां, आता साठसत्तर वर्षांनंतर वारीतल्या गैरसोयी नाहीश्या होण्याचीही शक्यता आहे. स्वच्छतागृहे आणि निवासाची सोय यांमध्ये सुधारणा झाली तर कदाचित नेहेमीच्या वारकऱ्यांसोबत तरुणाईची गर्दीही वाढू शकेल. पण याची शक्यता थोडी धूसर वाटते कारण दहा लाखांपेक्षा जास्त गर्दीला सामावून घेण्यासाठी वारीचा मार्ग आणि पंढरपूर गाव यांचा आराखडा संपूर्ण नव्याने आखावा लागेल किंवा लोकांना दोन-तीन वाऱ्यांत विभागावे लागेल. गेल्याच आठवड्यातल्या एका बातमीनुसार वारकरी आणि फडकऱ्यांच्या बैठकीत याचे सूतोवाच करण्यात आलेले आहे. म्हणजे हौश्यानवश्यांनी वारीच्या एक मुक्काम मागे चालावे असे काहीतरी.