लेख छान जमला आहे. नर्मविनोद का काय म्हणतात तो चांगला साधला आहे.
बाकी संक्रांतीचे लाडू हे एक खास प्रकरण आहे. काही इतके टणक की आधी दातांचा विमा उतरवून मगच खायला घ्यावे. काही फारसे टणक नव्हेत पण इतके चिवट की तुकडा मो(तो)डल्यावर गुळाची एक लांबच लांब तार दोन्ही जबड्यांमध्ये येते. नुसतीच तार. कड कट्ट वगैरे काही नाही. ह्या अनुभवाने शहाणे होऊन एखादा सुंदर दिसणारा खसखस वगैरे चिकटवलेला लाडू जोर लावून खायला जावे तर दोन्ही जबडे त्यात आरपार जातात आणि तो लाडू दोन्ही जबड्यांना चिकटून बसतो. ना तोंड उघडता येत ना मिटता येत. आमच्या शेजारच्या एक काकू दरवर्षी तिळाच्या वड्याच करतात आणि 'माझ्या वड्या ना अगदी छान खुसखुशीत होतात. बघा तरी चव घेऊन' असे न चुकता म्हणून वडी हातावर ठेवतात. वडी छान झालेली असते; पण मला ठाऊक आहे-ठाऊक कसले, खात्रीच आहे-त्यांना लाडू जमत नाहीत म्हणून त्या वड्या करतात.
तुम्ही लाडवांना बाँबची उपमा दिलीच आहे. मला अशी सूचना करावीशी वाटते की लाडू वळणारणींनी लाडवांत एकेक प्लास्टिकची किंवा कसली तरी पिन घालून ठेवावी , अशासाठी की ती पिन ओढली की लाडू आपोआप फुटेल.
असो. पुढील लेखाच्या प्रतीक्षेत.