कथा/स्फुट लेखन आवडले. शेवट थोडासा अपूर्ण वाटला हे खरे आहे, पण अगदी प्रत्येक कथेचा शेवट "दे हॅपीली लिव्हड एवर आफ्टर" या छापाचा सुखांत व्हायला हवा असे नाही.
"चलो इक बार" बद्दल थोडेसे. गाण्यामध्ये "वो अफसाना जिसे अंजाम तक लाना ना हो मुमकिन" असेच आहे. पण मूळ कवितेत "तकमील तक" आहे. श्री. माधव मोहोळकर साहिर लुधियानवी यांना भेटले असता साहिरने त्यांना सांगितले "या कवितेचे गाणे करताना त्यातला एकही शब्द बदलावा लागला नाही. " त्यावर श्री. मोहोळकर उत्तरले "फक्त एक शब्द वगळता". साहिरने आश्चर्याने पाहिले तेव्हा मोहोळकर म्हणाले "मूळ कवितेतल्या तकमील तक ऐवजी अंजाम तक असा बदल केला आहे. " त्यावर साहिरच्या नजरेत कौतुकाचे भाव तरळून गेले.
विनायक