माझ्या मते कोणतीही कविता वाईट असुच शकत नाही कारण कुठलीही कविता संवेदनशिल मनाच्या जाणीवेचा आतून आलेला हुंकार असतो,
असं जाणीवा जपनारं संवेदनशिल मन असनं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. एखाद्या गोष्टीची जाणीव किती तिव्र आहे त्यानुसार आपल्या जवळ
असलेल्या शब्द भांडारातून तेव्हढे वजनदार शब्द कागदावर उमटतात आणि वाचकापर्यंत कसे पोचतात हे महत्त्वाचं असतं ईतकच. माझ्या
लेखी यालाच जास्त महत्त्व आहे बाकी ताल, लय, छंद, हे दुय्यम आहे. आपल्याला जी दाद मिळते ति एका जिवंत मनाने दुसऱ्या जिवंत मनाला
दिलेली दाद समजावी.