भेटी लागी जीवा लागलीसे आस...ओढीचे मनोज्ञ दर्शन घडले.

अंतरीच्या अशा तळमळीतच
पांडुरंग वास करतो.

आजा-आजी हे दैवत
उगा शोधावी जेजूरी
माझ्या अंतरी नांदती
तेच म्हाळसा-मल्हारी

माय-बापाचे चरण
धुळ झाडतात घरी
तोच माझा अष्टगंध
भाळी वसते पंढरी....!!!