महेश्जी,
वृत्ताच्या लगावलीप्रमाणे (लगागा लगागा लगागा लगागा) पुन्हा र । क्क्त वर्णी । नभी रा । त्र झाली । असे वर्गीकरण केले असता रक्त येथे यतीभंग झाला आहे का अशी माझी शंका आहे.
उद्धवजी,
आपले बरोबर आहे. अंत्य यमकात 'झाली' प्रमाणे 'आ' ही अलामत येते, तर 'गेली 'मध्ये 'ए' ही अलामत येते.
मी सुद्धा गझल शिकण्याचा प्रयत्न करतो आहे. येथील लेखक जाणकार आहेत. मार्गदर्शन केल्या बद्दल मनःपुर्वक आभारी आहे.