राहिला प्रश्न गाण्याच्या उदाहरणाचा, तर पद्याला लावलेल्या चालीवरून यती व यतिभंग ठरवायचा नसतो हे पटवर्धनांनी आपल्या ग्रंथांत सांगितलेले आहे.ह्याला कारण, "गवई हा हवी ती गोष्ट हव्या त्या तालांत म्हणू शकतो. कोणतेंहि अक्षर सोयीप्रमाणे लघु वा गुरु म्हणणें, वाटेल त्या ठिकाणी शब्द तोडणें, स्वर लाम्बवून मात्रांची संख्या भरून काढणें इत्यादि गोष्टींची त्याला मोकळीक असल्याने म्हणावयाचा भाग तो हवा तसा जुळवून घेऊन म्हणतो. पद्य षण्मात्रक आवर्तनाचे दिसलें तरी तो तें अष्टमात्रक आवर्तनाच्या पद्यासारखें म्हणू शकतो... गवई हा अनावर्तनी वृत्त सुद्धा जुळवून घेऊन तालांत म्हणू शकतो. सामान्य माणूस ही जुळवून घेण्याची, बसविण्याची यातायात करीत नाही. सरळ लिहिल्याप्रमाणे उच्चार करीत थोडेसें गळ्यावर म्हणायला लागतांच जें आवर्तन जाणवतें, जें अक्षरानुसारी असतें तेंच त्या पद्याचें आवर्तन होय..."  

मलाही हे पटते.  दिल ढूंढता है (मौसम, मदन मोहन) ह्या गाण्याच्या दोन चाली आहेत.
एकात दिल ढूढता है / फिर वही /    असे यती आहेत.  तर
दुसऱ्यात दिल ढूंढता / है फिर वही /  असे यती आहेत.

अक्षरानुसारी आवर्तनाबद्दल मी  फारसं बोलू शकत नाही पण अक्षररचनेवर गेयता थोडी फार तरी  अवलंबून असते.
आज गोकुळात रंग खेळतो हरी
ह्यामध्ये ल गा ल गा ल गा ... असा अक्षरक्रम असल्याने त्यात अंगभूत लय आणि ठेका आहे.

चू. भू. द्या. घ्या. चर्चेत भाग घेण्याच्या औद्धत्याबद्दल क्षमस्व.