एकंदर गझल आवडली.

रोज थोडी रात्र येते, पौर्णिमेच्या चांदण्याची?
ह्या ओळीच्या शेवटी प्रश्नचिह्न असल्यामुळे रोजच्या रोज पौर्णिमेची रात्र असू शकत नाही हा अर्थ समजला तरी थोडी ह्या शब्दाचा वापर तेवढा आवडला नाही. रोज थोडीच पौर्णिमेची रात्र येते? हे बोली भाषेतले वाक्य गद्य संवादात ठीक वाटेल, पण पद्यात वापरलेले आवडले नाही. गझलेतील इतर ओळींच्या तुलनेत ही ओळ शब्दवापराच्या दृष्टीने कमी प्रतीची वाटली.

आणखी एक गोष्ट म्हणजे डोळ्यात मधील ळ्या वर अनुस्वार हवा, म्हणजे दोन्ही डोळ्यांत आसवे येतील, नाहीतर एकाच डोळ्यात आसवे आहेत असा अर्थ होतो.