नमस्कार.

१. पहिल्या शोधसूत्रानुसार  पुढील पर्याय असू शकतात.

    क.    १२, ३, १
    ख.     ६, ६, १
    ग.      ६, ३, २
    घ.     ४, ३, ३
    ङ.    ९, २, २

२. दुसऱ्या शोधसूत्रानुसार पर्याय क बाद होतो कारण वयांची बेरीज १५ पेक्षा जास्त होत आहे.

परंतु तिसऱ्या सूत्रावरून मला अद्याप तरी काही निष्कर्ष काढता येत नाही.

तिघींपैकी कोणीच जुळ्या नाहीत असे शोधसूत्र असते तर पर्याय  ख, घ, ङ  बाद झाले असते. म्हणजे उत्तर पर्याय ग : ६, ३, २.

मी बारकाईने मोठ्या मुलींचे (अनेकवचन) डोळे निळे... असे आहे की काय ते पाहिले. तसे असते तर दोन मुली जुळ्या आहेत आणि त्या मोठ्या आहेत असा निष्कर्ष निघाला असता  आणि उत्तर पर्याय ख : ६, ६, १ असे झाले असते.

पण डोळ्यातच काहीतरी आहे आणि काय आहे ते मला कळत नाही आहे.

-मीरा फाटक
(कोड्यासंबंधी प्रश्नोत्तरे कृपया प्रतिसादाचे स्वरूपातच करावी. : प्रशासक)