माझ्या मुलींच्या वयांचा गुणाकार छत्तीस होतो!
ठीक. असा गुणाकार येणाऱ्या धन संख्यांच्या सर्व काँबिनेशनांची यादी केली. (ही झाली पहिली यादी.)
(गृहीतके: १. सर्व वये पूर्णांकांत आहेत. २. एकाही मुलीचे वय एक वर्षाहून कमी नाही. (अर्थात असले, तरी पहिल्या गृहीतकानुसार ते शून्य धरले जाईल, आणि त्या परिस्थितीत गुणाकार ३६ येणे शक्य नाही; सबब, हे दुसरे गृहीतक तसे आवश्यक नाही.))
त्यांच्या वयाची बेरीज आजच्या तिथीएवढी आहे!
याचा अर्थ, वयांची बेरीज पंधराहून अधिक नाही. (प्रतिपदा = १ आणि पौर्णिमा/अमावास्या=१५ असे गृहीत धरले आहे.)
ठीक. वयांची बेरीज पंधराहून अधिक येणारी सर्व काँबिनेशने पहिल्या यादीतून काढून टाकली. (ही झाली दुसरी यादी.)
"माझ्या मोठ्या मुलीचे डोळे अगदी माझ्यासारखे निळे आहेत! "
"मोठी मुलगी"? हं हं!
म्हणजे, "थोरल्या" दोन मुली जुळ्या नव्हेत तर! ("धाकट्या" दोन मुली तरीही जुळ्या असू शकतात. )
ठीक. "थोरल्या" दोन मुली जुळ्या ठरतील, अशी सर्व काँबिनेशने दुसऱ्या यादीतून काढून टाकली. (ही झाली तिसरी यादी.)
या तिसऱ्या यादीत तरीही पुढील चार काँबिनेशने राहतात:
(१, ४, ९), (२, २, ९), (२, ३, ६), (३, ३, ४).
यांपैकी कोणतीतरी तीन काँबिनेशने नेमकी कशी हटवायची बरे?
तरी, (२, ३, ६) आणि (३, ३, ४) या काँबिनेशनाची शक्यता 'दोन मुलांमधील किमान अंतर' या तत्त्वास अनुसरून 'कॉमन सेन्स'ने थोडी कमीच वाटते. (म्हणजे, एका अपत्याच्या जन्मानंतर पुढल्याच वर्षी दुसरे अपत्य होण्याकरिता, त्या दुसऱ्या अपत्याच्या जन्माकरिताची 'तयारी' किती लवकर सुरू करावी लागेल बरे? तरी बरे, अपत्याच्या स्तनपानाचे काळात दुसरी गर्भधारणा होण्याची शक्यता कमी असणे वगैरे गृहीत धरलेले नाही. 'फॉर्म्युल्या'च्या सहज उपलब्धतेच्या आजच्या काळात ते गृहीतक तितकेसे उचित वाटत नाही.) मात्र, ही काँबिनेशने अगदीच अशक्य असावीत काय, याबाबत साशंक आहे. कदाचित तज्ज्ञ गायनेकलॉजिस्टच (यांस "स्त्री'रोग'तज्ज्ञ" म्हणणे जिवावर येते.) यावर प्रकाश पाडू शकतील. परंतु तरीही, उदार अंतःकरणाने ही दोन काँबिनेशने तूर्तास बाद मानू.
परंतु उर्वरित दोन काँबिनेशनांचे काय? (१, ४, ९)चे बाबतीत, १ वर्षाची मुलगी (विशेष करून फॉर्म्युल्यावर असल्यास) घरी बेबीसिटर अथवा सासूकडे सोपवून कार्यक्रमाला येणे, अथवा कार्यक्रमाला आलेल्या परंतु इतरत्र उंडारणाऱ्या नवऱ्याकडे सोपवणे, हे शक्य असावे. सबब, ते काँबिनेशन इतक्या सहजी हटवता येऊ नये. आणि (२, २, ९) हे काँबिनेशन अशक्य वाटण्याचे कोणतेच कारण दृग्गोचर होत नाही.
अवांतर:
(नेत्राचा मुलगा या वर्षी हायस्कूलच्या शेवटच्या वर्षाला होता ना.
)
हे "शोधसूत्र" होऊ शकत नाही. नयनाला मुली उशिरा झालेल्या असू शकतात. (अथवा नेत्राला मुलगा लवकर झालेला असू शकतो.)