आताच लेख वाचला आणि त्याकाळातल्या अनेक आठवणी जाग्या झाल्या. मीही त्याच बॅचचा असल्याने सर्व कांही तंतोतंत जुळले. सिओईपीचा विद्यार्थी असण्याचा अभिमान आणखी एका कारणाने असायचा आणि ते कारण म्हणजे जेथे विश्वेश्वरअय्या शिकले तेथे शिकायला मिळण्याचे भाग्य हे होय. कॉलेजचा इतिहास मात्र इतका तपशिलाने माहीत नव्हता.
पहिल्या वर्षाच्या गॅदरिंगम्ध्ये वर्तकांना "इनव्हिजिबल मॅन" व ओगल्यांना "द मॅन हु न्यु टु मच" असे फिशपॉंड मिळाले होते. तर आठवल्यांना
"अजीब दास्तॉं है ये,
कहॉं शुरू कहॉं खतम
ये इलेक्ट्रीसिटी क्या चीज है
न वो जाने न हम"
असा मिळाला होता असे आठवते.
तसेच पानशेतच्या पुराच्या वेळी [दुसऱ्या वर्षाच्या सुरुवातीस ] रेल्वे रुळाशेजारच्या पुलावरून कसाबसा पलिकडे सटकू शकलो त्याची आठवण झाली.
बोटिंगमध्ये मात्र मी सिन्गल व्हिप सहज चालविण्यापर्यंत मजल मारली होती आणि बोट क्लब मॅनेजिंग कमिटीचा बीई सि आर होतो.
एस ई वर्षाच्या आठवणींची वाट पहातो आहे.
श. दा. गोखले]