कवितेला शिर्षक देतानाच मला वाटलेच होते की
पहिली प्रतिक्रीया तुमचीच येईल म्हणून... तशी ति आली...

हा उपदेश नाही, उपदेश देवत्वाला पोचलेल्यांनी करायचा असतो.
हि मित्रत्वाच्या नात्याने केलेली कळकळीची विनंती आहे त्या सर्वांसाठी
जे निराशेने ग्रस्त होउन जीवनाकडे डोळसपणे पाहण्याची द्रुष्टीच गमावतात,
कवितेकडे मी जनसेवेचं माध्यम म्हणून पाहतो, कवी, साहित्यीक वगैरे मला म्हणौन घ्यायचं नाहिए,
मला जो काही जीवनानुभव आला त्याचा लाभ ईतरांनाही होउन त्यांच्याही जगण्याला दिशा मिळावी  
यासाठी माझा हा काव्य प्रपंच आहे, याद्वारे एका जरी व्यक्तीचं जीवन फुलवू शकलो तर माझ्या जीवनाचं सार्थक झालं
असं मी समजेन.
जे जे आपणासी ठावे
ते ते इतरांसी सांगावे
शहाणे करोनी सोडावे
सकळ जन.......‌(संतवचन) अभिप्रायाबद्दल आभार.