ओळख बनली आहे. तरुणांच्या सहभागाविषयी एक प्रातिनिधिक उदाहरण सांगावयाचे तर माझा समवयस्क मामा एका दुर्दैवी अपघातात वारल्यानंतर त्याचा मुलाने, तो स्नातक आहे नि शेती सांभाळतो, मामाची तुकाराममहाराजांच्या पालखीबरोबर वारी करण्याची परंपरा स्वतःहून सांभाळली आहे. दुसरे असे की, आज अनिश्चित भवितव्यामुळे फार मोठा तरुण वर्ग देव-महाराज वेडा बनत चालला आहे नि मठ-देवस्थानांना नियमित जाताना दिसत आहे. तसेच, शिर्डी, शेगाव आदी क्षेत्रांना जाणाऱ्या वाऱ्यातून  सहभागी होणाऱ्या तरुणांची संख्याही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अनिश्चित भवितव्याबाबतची परिस्थिती पुढे फारशी बदलण्याची शक्यता धूसर दिसते.
'सोयी - सुविधांमुळेही वाढेल; कदाचित काही बदलही होतील' हे मात्र पटते.