हे असं अहे बहुतेकः
छत्तीस गुणाकार यायचा असेल तर वयांची त्रिकं अशी येतीलः
१ ४ ९
१ ६ ६
१ २ १८
१ १ ३६
१ ३ १२
२ ६ ३
२ ९ २
३ ४ ३
आता ह्यातल्या प्रत्येक त्रिकाची बेरीजः
१४
१३
२१
३८
१६
११
१३
१०
आता असं होईल.
एकतर आजची तिथी कोणती आहे हे कोड्यात स्पष्ट आहेच. आणि ३६ गुणाकाराची त्रिकं ही वर आहेत. ह्या दोघांची सांगड घालता,
वरीलपैकीच कोणतेतरी त्रिक बरोबर असणार हे उघड आहे. वरची यादी पाहता, १३ एक सोडलं तर बाकी बेरजा एकदाच येतात. जर त्यापैकी कोणतीही तिथी असती, तर सांगणारीला लगेच उत्तर मिळालं असतं. पण तसं झालेलं नाहीए. म्हणजेच तिथी अशी आहे जिच्या दोन शक्यता आहेत. म्हणुनच तिनं तिसरं शोधसूत्र मागितलंय. आणि मग तिला कळलं की "मोठ्या मुलीचे......... "(पुढचं महत्त्वाचं नाहीच्चंय मुळी)
तिला "मोठी" ऍज सच मुलगी (मुली नाहीत)आहे याचा अर्थ २ ९ २ हेच बरोबर आहे. १ ६ ६ ह्यात दोन मोठ्या मुली होतात.