तीन वयांचा गुणाकार ३६ यायला ( १,१,३६), (१,२,१८), (१,३,१२), (१,४,९), (१,६,६), (२,२,९), (२,३,६), ( ३,३,४) एवढे पर्याय आहेत.
दुसऱ्या हिंट नुसार बेरीज ही त्या दिवशीची तिथी आहे. त्यामुळे पहिले ३ पर्याय बाद ( तिथी १५ च्या पुढे असू शकत नाही)
उरलेल्या पर्यायांची बेरीज अनुक्रमे अशी येते १४, १३, १३, ११, १०
त्या स्त्रीला त्या दिवशीची तिथी समोर छापलेली दिसत होती. ती तिथी चतुर्दशी, एकादशी अथवा दशमी असती तर तिला तिसऱ्या हिंटची आवश्यकता नव्हती त्यामुळे त्या तिथ्या बाद
उरले दोन पर्याय १,६,६ आणि २,२,९ ( तिथी सारखीच येत असल्याने तिसऱ्या हिंटची आव्श्यकता पडली)
मोठ्या मुलीचे डोळे ( मोठी मुलगी = एकवचन ) ही हिंट असल्याने २,२,९ हा एकच पर्याय उरतो