'होता' ह्या शब्दाचा कोणता अर्थ घेतला जातो ह्यावर ह्या द्विपदीचे दोन वेगळे अर्थ निघतात. होता 'आहे'चा भूतकाळ म्हणून वाचला तर सरळ अर्थ निघतो: मनाला सदैव श्रीचा -संपत्तीचा- मोह होता तरी तोंडाने मात्र दुटप्पीपणे देवाचे नाव घेत होतो. पण 'होता' जर 'जेव्हा जेव्हा झाला' अशा अर्थाने घेतला तर द्विपदीचा अर्थ जवळ जवळ उलट होतो: मनाला संपत्तीचा मोह नेहमी झाला पण जेव्हा जेव्हा झाला त्या त्या वेळी मी देवाचे नाव घेतले (व माझा मोह नष्ट झाला). हे दोन्ही अर्थ हवे म्हणून वाक्याची रचना अशी करावी लागली व त्यासाठी सदोदितऐवजी सदोदीत ही सूट घ्यावी लागली. तुम्ही सुचवलेल्या बदलात फक्त पहिलाच अर्थ येतो. दोन्ही अर्थ अंतर्भूत असलेला बदल मला सुचला नाही. तुम्हाला सुचल्यास जरूर सांगा, मी नक्कीच गझलेत बदल करेन.