श्री संभाजीराव भिडे गुरुजी आणि मी..........आणि माझ्यातले शिवछत्रपती जागे झाले...!
साधारण ५ वर्षा पूर्वीची गोष्ट आहे. मी सातारा जिल्ह्यातील कराड या गावी (एक छोटे नगर म्हणले तरी चालेल) काही कामा निमित्त गेलो होतो. काम उरकून परत पुण्याला यायचे होते म्हणून एसटी स्टॅंड वर गेलो . लगेच एक पुणे गाडी मिळाली त्या गाडीत लगबगीने चढलो. आणि जागेच्या शोधार्थ इकडे तिकडे नजर फिरविली . साधारण तिसर्या चौथ्या रांगेत एक झुपकेदार मिशांचा डोक्यावर पांढरी टोपी आणि आंगत धोतर आणि सदरा घातलेला म्हातारा एक म्हातारा माणूस बसला होता.आगदी इतिहासातील शेलार मामा शोभून दिसावेत अशी शरीरयष्ठी आणि वेशभूषा होती. त्या माणसाच्या शेजारील सीट रिकमीच होती. मी लगेच तिथे जाऊन बसलो.
गाडी निघाली मी नेहमी प्रमाणे मोबाइल काढून बसलो. असाच मोबाइल मधील मेमरी कार्ड मधे मला एक पोवाडा सापडला. तो मी लावला. मी पोवाडा ऐकत आसताना तो माणूस माझ्याकडे बघत होता. मी दुर्लक्ष करत होतो. तरीही तो माणूस माझ्याकडे सारख सारख बघत होता. थोड्या वेळाने पोवाडा संपल्यावर त्यांनी मला विचारले बाळा तू कुठल्या गावचा..?
मी लगेच पुणे असे उत्तर दिले. त्यांनी बर....! म्हणून मान हलविली आणि म्हणाले. पुणे या गावात खूप मोठी ताकद आहे छत्रपतींनी पुण्याच्या जोरावर हिंदवी स्वराज्य उभ केल पण आज च्या पुण्यातील लोकांच्या स्मराणातून ती ताकद नाहीशी होत चालली आहे.
मी देखील हो म्हणून मान डोलाविली.त्यांनी माझे नाव विचारले . मी सांगितले मग त्यांना मी विचारले तुम्ही कुठल्या गावचे. त्यावर ते म्हणाले मला कुठले गाव नाही ज्या प्रमाणे मुंगी अन्नाच्या शोधार्थ वारुळातुन बाहेर पडून फिरत असते त्या प्रमाणे मी शिवभकतांच्या शोधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही फिरत असतो.
या महाराष्ट्राला शिवरायांच्या बद्दल नितांत आदर आहे , प्रत्येकाच्या मनात शिवछत्रपतींच्या बद्दल प्रेम आहे. पण कोणाच्या मनात शिवरायांच्या बद्दल भक्ति नाही. ती निर्माण केली पाहिजे यासाठी मी गावोगाव हिंडत आसतो.
शिवछत्रपतींचे आयुष्य हिंदवी स्वराज्य उभे करण्यात खर्ची पडले , संभाजी महाराजांनी हे हिंदूंचे साम्राज्य आणि हिंदू धर्म टिकविण्या साठी बलिदान दिले. याच कार्यासाठी करोडो मराठ्यांनी आपल्या घरावर तुळशी पत्र ठेवून शिवछत्रपतींना आपले आयुष्य अर्पण केले. कित्येक मराठे धारतीर्थी पडले. पण आज चा मराठा समाज आणि एकंदरीतच संपूर्ण हिंदूसमाज शिवाजी संभाजी या विचारधारेला सोडून , गांधीजी पंडितजी या गांडू वृत्तीच्या मार्गावर चालतो आहे , ही मोठी शोकांतिका आहे.
त्यांनी शिवछत्रपती , संभाजी महाराज , मराठा साम्राज्य , हिंदूंचे सिंहसन या बद्दल बरेच काही सांगितले. गाडी पुण्याच्या जवळ आली तसे ते म्हणाले बाळा मला एक फोन करायचा आहे आणि त्यांनी एक नंबर पटापट सांगितला. मी त्या नंबर वर फोन लावला आणि त्यांना दिला. ते फोन वर कोणाला तरी स्वारगेट ला घ्यायला या असे सांगत होते. त्यांना मी विचारले पुण्यात काय काम आहे..? ते म्हणाले पुण्यातील शिवभकतांची बैठक ( मीटिंग ) आहे तिकडे निघालोय. त्यांना मी म्हणालो की मी आलो तर चालेल का..? ते म्हणाले का नाही. मग आम्ही बैठकीच्या ( मीटिंग च्या ) ठिकाणी गेलो. तिथे साधारण १०० , १२५ तरुण वाट बघत होते. तिथे एक तरुण शिवाजी महाराजांच्या वरील गीत ( गाणे ) सांगत होता. आम्ही दोघे तिथे पोहोचलो आणि सर्वांच्या मागे बसलो. थोड्या वेळाने गीत ( गाणे ) संपल्यावर तो माणूस उठला आणि मला उठवून सर्वांच्या पुढे नेले. आम्ही दोघे तिथे बसलो. काही जन गुरुजी आले गुरुजी आले म्हणून दक्ष होताना दिसत होते. हे लोक असे का करतायत असा विचार करत असतानाच त्यांनी सर्वांना माझी ओळख करून दिली. आणि नंतर बैठकीला ( मीटिंग ) ला सुरूवात झाली. बैठक संपल्या नंतर सर्व जण त्यांच्या पाया पडू लागले. मी देखील त्यांना वाकून नमस्कार केला. नंतर एका माणसाने माझा नंबर घेतला.त्या म्हातर्या माणसाने देखील त्याच्या जवळच्या पिशवी मधून एक कागद काढून माझा नंबर त्याच्या वर लिहून घेतला. मी देखील दोघा तिघांचे नंबर घेतलें. आणि नंतर सर्व जन आपापल्या घरी निघून गेले.
लोक ज्याला गुरुजी गुरुजी म्हणून आदराने वागावत होते, त्या म्हातर्या माणसा बद्दल अधिक कुतूहल वाटू लागले. दोन तीन दिवसांनी मी एकाला फोन करून भेटायला गेलो. त्याला त्या म्हातर्या माणसा बद्दल विचरलें. मग मला त्या माणसा बद्दल थोडी माहिती मिळाली. त्यांचे नाव संभाजीराव भिडे गुरुजी . श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या लाखो निष्ठावंत शिवभकत धरकार्यांच्या संघटनेचे ते संस्थापक आहेत. मग मी त्याला संघटने बद्दल माहिती विचारली तेंव्हा त्याने मला सांगितले "असेतु हिमाचल कोणताही स्त्री पुरूष भेद न करता हर एकाच्या अं:तकरणात , हृदयात , लहान मोठया मेंदूत , डाव्या उजव्या काळजात , तांबड्या पांढर्या पेशीत , आणि रक्ताच्या थेंबा थेंबात शिवाजी - संभाजी हे दोन जगण्या मरण्याचे मंत्र बिंबवणे हे क्रमांक एक चे राष्ट्रोत्थानाचे काम आहे " आणि हेच काम करण्या साठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटने चा जन्म झालाय.
मग साधारण १५ दिवसांनी गुरुजींचा मला फोन आला त्यांनी माझी चौकशी केली.या आगोदर देखील संभाजी ब्रिगेड , मराठा सेवा संघ अशा बर्याच संघटनांची कामे बघितली होती पण हे काम त्या पेक्षा काहीतरी वेगळे होते. म्हणून मी या कार्या कडे वळलो. मी त्यांना संघटने चे काम आवडल्या बद्दल आणि तुमच्या बरोबर काम करण्या ची इच्छा बोलून दाखविली. त्यांनी देखील तुझ्या सारख्या तरुणांची या देशाला गरज आहे असे म्हणून जणू काही माझी पाठच थोपटली. मग तेंव्हा पासून मी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटने बरोबर काम करू लागलो.
गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजींच्या एका भेटीताच मला माझ्या मधील शिवछत्रपती जागे झाल्याच्या भास होत होता...!
अधिक माहिती साठी dharkari.blogspot.in या ब्लोग ला भेट द्या