भुईंज या तशा छोट्या गावी कामानिमित्याने अधेमध्ये ये-जा झाली आहेच, पण या गावात मेघा यांच्यासारखी बुद्धिने हिरकणी असलेली कन्यका राहात असेल याची पुसटशीदेखील कल्पना आली नाही. आज हा लेख वाचल्यानंतर समजले की वेळीच योग्य मार्गदर्शन मिळाले म्हणजे अशी कुशाग्र बुद्धी असलेली विद्यार्थिनी त्याचे सोने करून दाखवितेच.

रक्ताच्या काविळीवर संशोधन करून पीएच.डी. मिळविणाऱ्या डॉ. मेघा यानी सेवेसाठी परत इकडे येण्याची मनिषा प्रकट केली आहे त्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन.