मिलिंदजी छान गझल! अभिनंदन!
काही मिसरे असे वाचून पाहिले! पहा कसे वाटते ते.......
कधी कोणते रंग वा ढंग केले?
सदा मेनकांनी तपोभंग केले!
उभा जन्म सत्संग शोधीत होतो...
सग्यासोयर्यांनीच निःसंग केले!
अहोरात्र श्रीचाच निजध्यास होता...
मुखे नित्य "श्रीरंग, श्रीरंग" केले!
नका शेंदरानेच दगडास माखू;
अशानेच नाच्यास नटरंग केले!!
न गेलो मशीदीत वा मंदिरी मी!
तुझ्या बाहुपाशात सत्संग केले!!
न शेरात मी ठेवला आडपडदा!
मनाचे उघड अंग-प्रत्यंग केले!!
..................प्रा.सतीश देवपूरकर