मना मोह होताच श्रीचा सदोदित
मुखे मात्र 'श्रीरंग, श्रीरंग' केले
- फार छान. मात्र ( ) एक अडचण आहे, महेशराव. मूळ द्विपदीच्या पहिल्या वाचनात 'होता'चे व त्यामुळे द्विपदीचे दोन अर्थ तुमच्यासारख्या विचक्षण वाचकाच्याही लक्षात आले नाही. द्विपदीच्या आताच्या स्वरूपात 'होता'चेच नव्हे तर 'मात्र'चेही दोन अर्थ वाचकांना समजणे आवश्यक आहे. कवी म्हणून मला तुमची सुचवणी अतिशय आवडली. ती द्विपदीचे सौंदर्य वाढवते. पण 'अयोग्य श्लेष: नास्ति, वाचक: तत्र दुर्लभ:' असे होईल की काय ही भीती वाटते.