अव्यक्त शब्दांची खळखळ

खोल जीवाला लागलेली झळ

न दिसणाऱ्या काट्याची कळ

     म्हणजेच काव्य ....

निसर्गाच्या कुंचल्यातिल  बेधुंद रंग

भावनांचे उभारणारे अनंत तरंग

जिवनाचे रोजचे नव-नवे ढंग

शिवपणात नेणारा शब्दांचा   संग

                   म्हणजेच काव्य ....