राजेन्द्र जी...
मेघनाच्या शिक्षणक्षेत्रातील कमाई बरोबरीनेच तुम्ही आपली सुकन्या प्रियांका हिच्या बौद्धिक झेपेचा आढावा म.टा. वरून उपलब्ध करून दिल्याबद्दल मी तुमचे मनःपूर्वक आभार मानतो. 'कॅन्सर' वर जितके संशोधन आणि प्रयत्न होणे गरजेचे आहे हे जितके सत्य तितकेच हेही सत्यच की करीअरसाठी शेकडो क्षेत्रे उपलब्ध असतानाही प्रियांका आणि मेघना यासारख्या तरुणी आपल्या ज्ञानाचा उपयोग कॅन्सरसाठी देऊ इच्छितात त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक सर्वच पातळीवर होणे गरजेचे आहे . माझी धाकटी बहीण कॅन्सरने पिडीत होती आणि कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये तिच्यावर 'केमोथेरपी' करताना तिची अवस्था कशी 'बॅड टु वर्स्ट' होत गेली त्याचा मी साक्षीदार आहे. ती जगलीही नाही. त्या दिवसापासून मी कुणी कॅन्सरसाठी संशोधन करण्याची मनिषा बाळगताना दिसले की त्याला/तिला १००% यश लाभो अशीच देवाजवळ प्रार्थना करीत असतो.
पॅरिसमध्ये प्रियांका अभ्यासाव्यतिरिक्तही ज्या विविध सांस्कृतिक उलाढालीमध्ये सहभागी होत असते हे वाचूनही आनंद झाला. तिच्या भावी वाटचालीविषयी हार्दिक शुभेच्छा.
अशोक पाटील