लेखकाच्या भावनांवरून आणि लेखनामधील उल्लेखांवरून असं वाटत नाही की प्रकरण फक्त मैत्रीपुरातेच राहिले आहे !
तसंही एक मुलगा आणि मुलगी ह्यांची मैत्री दोन मुलांमधल्या मैत्रीपेक्षा खूप वेगळी असते हा अनुभव आहे.
माझी पुढील विधाने कदाचित वादग्रस्त असू शकतील.
माझ्या मते मुलगा आणि मुलगी ह्यांच्यामाधली मैत्री आणि 'नातं' ह्यामध्ये खूप बारीक रेषा असते. आता बघा ह ..
"एखादा मिस कॉल किंवा कसा आहेस? सारखा मेसेज देखिल त्यात न लिहिलेले बरेच
शब्द, न बोललेल्या बऱ्याच भावना आपोआप एकमेकांपर्यंत पोचवतो..."
(बहुतेक हा 'फ्लर्ट' चाच एक प्रकार) तुलना केली तर विनाकारण असा मेसेज किंवा मिस कॉल एखादा मित्र दुसऱ्या मित्राला किती प्रमाणात करतो ?
"वीकएंड्सच भटकणं नाही, पावसातून भिजून आल्यावर तिच्या हातची कॉफी नाही"
ह्याचा अर्थ तुम्ही दोघंच (किंवा इतर मित्रांबरोबर तिला घेऊन) भटकता, तिच्या घरी जाऊन कॉफी पिता (सगळे मित्र असतात की फक्त तुम्हीच असता ?) ह्यात गैर काही नाही. पण असं केल्यानं दोघांमधील नातं मैत्रीच्या पुढे जाण्यास फार वेळ लागणार नाही असं वाटतं. (तेच झालं आहे का ? तुमच्या बाजूने तरी )
समजा ती 'एम एस' करायला जात नसून तिचे लग्न ठरले आहे.. तिच्या पसंतीच्या मुलाशी ... मग तुम्हाला खंत वाटेल की आनंद होईल ?
तिनं तिचा मार्ग पकडला आहे. त्यामुळे अधिक विचार करून डोळ्यांतून अश्रू वाया घालवायची गरज नाही. फेसबुक, जीमेल, स्काईप आहेतच. त्यामुळे तुम्ही संपर्कात राहू शकालच !
समजा भविष्यात ती भारतात परत आलीच तर (खात्रीशीर सांगता येईल ? ) तर तुम्ही परत भेटाल आणि वातावरण पूर्वीसारखे होऊ शकेल.