सखीजी, मनोगत वरील माझी वाटचाल पाहत असताना माझ्या 'जखमांचे पेव' या गझलवरची तुमची प्रतिक्रिया व तुम्ही व्यक्त केलेली अपेक्षा वचनात  आली, विलंबाबद्दल प्रथम माफी मागतो, गझल विषयी मला फारच थोडी माहिती आहे, पण गझल लिहीण्यासाठी कविता येण महत्त्वाचं आहे फरक ईतकाच की  पुर्ण कविता गझल मध्ये आपल्याला दोन ओळींमध्ये मांडायची असते ज्याला शेर म्हणतात, एका गझलमध्ये आपण वेगवेगळे विषय मांडू शकतो तसेच गझल मध्ये कमीतकमी पाच शेर आवश्यक असतात, मराठी गझलचे वेगळे व्याकरण व नियम आहेत, गझल अक्षरगण तसेच मात्रावृत्तात लिहिली जाते हे सर्व आभ्यासण्यासाठी तुम्हाला सुरेश भटांच्या 'एल्गार' या गझल संग्रहाची मदत होईल ज्याच्या प्रस्तावनेत व शेवटी गझलेची बाराखडी या लेखात सविस्तरपणे विवेचन केलेले आहे ते तुम्ही जरुर आभ्यासा मला खात्री आहे तुम्ही नक्की उत्तम गझल लिहू शकाल मग करा प्रयत्न.