'आत्ता', 'मोठ्ठा' या उदाहरणांच्या संदर्भात आपल्या म्हणण्यात तथ्य असावे ('सोप्पे' हे आणखी एक त्या पठडीतील उदाहरण सुचते), 'आज्जी'च्या संदर्भातही कदाचित ते मानता येईल, परंतु आपण मांडलेल्या इतर उदाहरणांच्या संदर्भात ते पटण्यासारखे वाटत नाही.
(कुल्ल्यांत कसले आले आहे डोंबलाचे 'भावनेचे आधिक्य'?)
(शिवाय, 'सुट्टी', 'सव्वा', 'कुल्ला' अशी रूपे वापरणारांकडून 'सुटी', 'सवा', 'कुला' अशी रूपे सहसा ऐकण्यात आलेली नाहीत, आणि व्हाइसे व्हर्सा. मला वाटते यात सामाजिक/जातीय/प्रादेशिक गटांच्या बोलीरूपांमधील भेद असण्याची शक्यता नाकारता येत नाही.)