'अधीक देखणे' हि रचना आजवर "निरंजन पाहणे" "मना आले ओ माये" अशी वाचनात/ऐकण्यात आली. तुम्हाला हा ' ॐ मयी'  पाठभेद कुठे सापडला? ज्ञानेश्वरी  वर देखील असा एखादा  पाठभेद तुमच्या वाचनात आला आहे का? असल्यास प्रकाशकाची माहिती/लिंक शेअर करा प्लीज.

या लेखमालेचे मधले दोन भाग मी वाचले नाहित. साहित्य सुचीत देखील ते दिसत नाहित. शक्य असल्यास लिंक द्यावी.

ज्ञानेश्वर माऊली तुम्ही सांगताय तशी एखादी प्रक्रिया निरुपण करताहेत असं मला तरी वाटत नाहि. जी झेन प्रक्रिया तुम्ही समजाऊन सांगत आहात ति  पहिल्या प्रक्रिये प्रमाणेच मनाच्या सतत कल्पनाविलास करण्याच्या वृत्तीवर काम करते, मनापासून मुक्ती देत नाहि. ते शक्यच नाहि. असो, याबाबत आपले मतभेद असल्यामुळे हा मुद्दा बाजुला ठेऊया.