"....त्यांनी कायमसाठी मनानं एकत्र व्हावं यासाठीच तर अशा आपत्तीचं प्रयोजन तर नसेल ना ?... "
~ हे वाक्य लेखाचा सार्थ अर्थ सांगत आहे. एरव्हीच्या जीवनशैलीत माणसाला धर्म जातपात सामाजिक दर्जा आर्थिक चढउतार आदी अनेक बाबीनी पार ओरबाडून टाकलेले असते. असले चित्र समाजाच्या सर्वच पैलूत दिसत असते, मात्र निसर्ग जेव्हा असा आपत्तीचा तडाखा देतो त्यावेळी मात्र माणसाला "जगण्यासाठी" काय करावे लागते याचा या लेखात फार प्रभावी उल्लेख करण्यात आला आहे.
लेखकाने महापूराबद्दल लिहिले आहे; पण मला वाटते १९६९ च्या सुमारास प. महाराष्ट्रात भूकंपाने असाच एक मोठा दणका दिला होता. त्यावेळीही अशीच एकी दाखविण्याची वेळ आली होती.