दरवर्षी पावसाळा येतो, ९ / ९ ही तारीख येते त्यावेळी या माणुसकीच्या महापुराची आठवण झाल्यावाचून राहत नाही, आणि तिच आठवण मग माझ्यातल्या ' माणसाला ' नवतीचं नव्हाळं पाजून जाते व त्या महापुराचा जिताजागता साक्षीदार होण्याचं भाग्य मला लाभलं ह्या सार्थ अभिमानानं उर भरून येतो व मनातून आणखी एक महापूर त्या क्षणापुरता का होईना वाहत राहतो......!!!

अत्यंत मनोवेधक. आनंदाचा प्रसंग असता तर वा वा असे म्हटल्यावाचून राहवले नसते.
-श्री. सर. (दोन्ही)