अनुभवकथन आवडले. शिवाय 'सारवासारव',' नवतीचं नव्हाळं पाजणं' हे शब्द जुन्या मूळच्या अर्थाने वापरलेले पाहून काहीतरी दुर्मीळ असे वाचल्याचा आनंद झाला. कारू-नारू ही जमात आणि शब्दही सध्या अस्तंगत झालेला. जुनी बलुतेदारीची (आम्हां शहरवासीयांना प्रत्यक्ष पाहवयास न मिळालेली) प्रथा डोळ्यांसमोर आली.
२००५ सालच्या प्रलयातही अशीच एकजूट पहावयास मिळाली होती. मोठ्या संकटाततरी लोक एकत्र येतात हे सुदैव आणि मोठ्या संकटातच एकत्र येतात हे दुर्दैव.