जयंता,
गझल सुंदर झाली आहे!
एक फक्त सांगू इच्छितो की, प्रथम अक्षरगणवृत्तात लिहिण्याचा सराव करावा, ज्याने आपल्या लिखाणास एक शिस्त लागते! मग खुशाल मात्रावृत्ताकडे वळावे!
मात्रा वृत्तात लय जाणणे व ती जपणे, खूप महत्वाचे असते! नुसतीच मात्रांची संख्या समान ठेवून चालत नाही! यासाठी वृत्त कोणतेही का असेना, नेहमी गुणगुणण्याची सवय ठेवावी म्हणजे वृत्ताची लय, नखरा, डौल, चाल सगळे अंगात भिनते व त्यानुसार सरावाने आशयानुकुल व भावानुकुल शब्द आपोआप ओठांवर येतात! हा अनुभव आम्ही घेत आहोत! तूही करून पहा! अक्षरगणवृत्तातील आमच्या बऱ्याच गझला येथे आहेत! त्या वाचल्यावर वृत्तातील सफाई व लिखाणातील गोटीबंदपणा तुझ्या लक्षात येईल! हे मी तुला आमच्या २५-३०वर्षांच्या डोळस गझललेखनानंतर सांगत आहे! पहा करून!
............प्रा.सतीश देवपूरकर