उदय,
तुमच्यात लिखाणाचा 'जर्म' आहे. मात्र अभ्यास खूप करावा लागेल. इतरांच्या मराठी-उर्दू गज़ल वाचणे, आशय, तंत्र, शैली समजून घेणे तसेच त्याच त्या कल्पनांची पुनरावृत्त्ती व शुद्धलेखनाच्या चुका टाळणे गरजेचे आहे. त्याबरोबर चौफेर वाचन आणि शब्दसंपदा वाढवणे हे सतत करावे लागेल.फावल्या वेळात मराठी शब्दकोश वाचत रहावा.
प्रतिसाद न आल्यास निराश होवू नये. लिखाणाचा दर्जा सुधारला की आपोआप येतात. चांगले प्रतिसाद आल्यावर हुरळून जाऊ नये. वाईट प्रतिसाद आल्यास 'जखमी' होवून वाद चालू नये.
मीही या सर्व अवस्थातून गेलो आहे पण तुम्हालाही याच दगडांवर ठेचाळावे लागेल त्यातूनच पुढचा रस्ता दिसेल.
शुभेच्छा!
जयन्ता५२