जयंतराव 

गझल आवडली.

प्रोफेसर

तुमच्या गझला वाचतो. आपली वृत्तावरची पकड जाणवते. पण स्पष्टच बोलायचे तर आपल्या प्रतिसादात गझलेत सुधारणा होण्यासाठी नेमके काय आवश्यक आहे हे सांगण्यापेक्षा आत्मप्रौढी जाणवते. उदा. ... सुरुवातीला ...अक्षरगणवृत्तात लिहिण्याचा सराव करावा. तुमच्या गझलांचा अभ्यास करावा म्हणजे तुमच्यासारखेच गोटीबंद वगैरे जे काही असते तसे लिहिता येईल, तुम्हाला २५-३० वर्षांचा अनुभव आहे वगैरे, तुम्ही कविता गुणगुणत असल्याने वृत्ताचा डौल, नखरा वगैरे वगैरे जे काही असतो तो तुम्हाला वश झाला आहे, ... मला लिहिल्याशिवाय राहवत नाही. एक वेळ गझलसम्राट सुरेश भटांनी या प्रकारची आत्मप्रौढीची भाषा वापरली असेलतर एक वेळ समजू शकतो, त्यांचा तितका अधिकार होता.  (त्यांनी वापरली की नाही मला माहिती नाही) परंतु आपण तशी वापरावी हे खटकते.

विनायक
(संपादित : प्रशासक)