नरेंद्र दाभोलकर या एका ध्येयवादी माणसाचा बळी गेल्यावर सरकारला जाग आली आणि कसलाही विचार न करता व कायद्याचा उद्देश व परिणाम यापैकी कशाचाही विचार न करता वटहुकूम काढून आपण कर्तव्य बजावले अशा गोड समजुतीत आपले सरकार राहिले. मुटे यांनी अगदी योग्य शब्दात त्याचा समाचार घेतला आहे. आज शासनास आपण काय कायदे करतो व ते कोण पाळते किंवा नाही याचे भानच उरले
 नाही. संसदेतही तेच चालू आहे.न्या. मू.रानडे, आगरकर यांया काळात इंग्रज राज्य करत होते म्हणूनच आपल्या समाजात समाजघटकांचा  विरोध असूनही थोडीतरी सुधारणा होऊ शकली असे आता नाइलाजाने म्हणावे लागेल.