दुसऱ्या भाषेतले शब्द असे घुसडून मराठी कितीही घाणेरडे झाले तरी चालते पण मराठी चुकीचे की बरोबर ते तपासून पाहणे हा मराठी लोकांत टिंगलीचा विषय समजला जातो. उलट दुसरी भाषा बोलताना मराठी माणूस चुकला तरी त्याची टिंगल मराठी लोक करतात हे तुम्हाला सगळीकडे इंटरनेटवर दिसेल.
अशी टिंगल मोठ्या मोठ्या लेखकांनीही केलेली आहे त्यामुळे अशी टिंगल करणाऱ्याला हमखास समविचारी मित्र मिळतात आणि ते शेफारत जातात असे मी पाहिलेले आहे
अर्थात पुरावे द्या, सगळेच काही असे नसतात, असे म्हणून हे उडवून लावता येईलच म्हणा.