आता ह्या साऱ्याची सवय करून घ्यायला हवी, कारण मुळात मराठी माणसांनाच आपल्या मातृभाषेची किंमत नाही.  जालसर्वज्ञांनी वर आपल्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे शुद्धतेचा आग्रह हा तर टिंगलीचा विषय झालेला आहेच; एखाद्याने (इतरांकडून तशी अपेक्षा न ठेवता) स्वतः मराठी शुद्ध बोलणे हे सुद्धा आजकाल टवाळीला निमंत्रण झाले आहे. राहिला प्रश्न अनुवादित जाहिरातींचा व मालिकांमधील मराठीचा, त्याबद्दलच्या तक्रारी ह्यापुढे केवळ अरण्यरुदन ठरण्याचीच शक्यता जास्त. तेव्हा, "तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते पाहावे" ही भूमिका ठेवावी. निदान मनाला त्रास तरी कमी होईल.