कदाचित दुसरी भाषा बोलताना लिहिताना आपल्या चुका होतील आणि त्या आपण सुधारू ह्यात गैर वाटत नसावे. पण आपलीच भाषा वापरताना आपल्या चुका दिसल्या तर प्रतिष्ठेला डाग पडत असावा. त्यामुळे अशा वेळी दुसऱ्याने चुका दाखवल्या तर "तुमचे बरोबर असेल पण सांगणारे तुम्ही कोण? " असा स्वसंरक्षणार्थ नखे काढण्याचा नैसर्गिक प्रकार होत असावा. आणि चुका सुधारणे हा कमीपणा वाटत असावा.
मला वाटते हा गृहीत सामाजिक उच्चनीचतेचा परिणाम असावा. कारण हेच जर एखाद्या लहान मुलाला सांगितले तर तो कदाचित ऐकेल पण मोठा माणूस अशी नखे (मनोमन का होईना) काढीलच.