'ए बी सी न्यूज' च्या ह्या पानावर वाचायला मिळालेली बातमी.
प्रत्येकी सुमारे सहाशे ते सातशे पृष्ठे असलेल्या एकंदर अकरा खंडांमध्ये प्रकाशित होणाऱ्या ह्या विश्वकोशात हिंदू संस्कृतिविषयक सुमारे सात हजार लेख आणि सुमारे एक हजार आकृत्या उदाहरणे वा चित्रे असणार आहेत. नुसत्या हिंदू धर्माबद्दलच नव्हे तर एकंदर दक्षिण आशियातील संस्कृतीबद्दलच हा एक संदर्भग्रंथ होईल असे म्हटलेले आहे.
सुमारे पंचवीस वर्षे चाललेले हे काम आता पूर्ण होत असून पुढच्या आठवड्यात अमेरिकेतील साऊथ कॅरोलायनामध्ये हा विश्वकोश प्रकाशित होणार असल्याचे कळते. पहिल्या मुद्रित आवृत्तीच्या तीन हजार प्रती असणार असून ग्रंथालये, धार्मिक संस्था आणि भारतीय संस्कृतीचे विद्यार्थी ह्यांना त्यात स्वारस्य वाटेल असे कळते.