'खोबरेल' या शब्दातच तेल हा शब्द संक्षिप्त रूपात अंतर्भूत आहे. खोबरे+ तेल=खोबरेल. जसे तीळ+तेल=तिळेल, एरंडेल, उंडेल (उंडीचे तेल),  भिरंडेल(भिरंडाचे म्हणजे रतांब्याचे तेल) इत्यादि. त्यामुळे खोबरेल तेल ही द्विरुक्ती.

त्याचप्रमाणे, 'रॉक'पासून (खडकापासून) निघणारे तेल ते 'रॉकेल' असावे काय? (रॉक + तेल = रॉकेल, असे?)