परंतू पुस्तक किंवा ही लेखमाला मी वृत्तपत्रासाठी लिहीत नसून आंतरजालावर लेखन करत आहे याचे भान आल्याने व काही आततायी प्रतिसादकांकडून माझ्यावर व्यक्तिगत पातळीवर हिणकस आरोप करणारे प्रतिसाद लिहिले जाण्याची शक्यता बळावल्याने, मग प्रत्येकाला स्वतंत्रपणे उत्तर देऊन स्वतःची दमछाक करून घेण्यापेक्षा या लेखांकात आत्मस्तुतीचा दोष स्वीकारून नाईलाजाने स्वतःबद्दल व्यक्तिगत माहिती मी लिहायचे ठरवले आहे.
या संकेतस्थळावर व्यक्तिगत पातळीवर हिणकस आरोप होण्याची शक्यता नाही हे लक्षात घेता हा भाग अनावश्यक ठरतो. विनाकारण आत्मस्तुतीपर लिहिल्याने मुख्य मुद्द्यांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे.
विनायक