एका आरोग्य विशेषांकातच वाचल्याचे आठवते - शहरातील एका माणसाला प्रचंड डोकेदुखीचा त्रास होता. अनेक डॉक्टरांना दाखवले, क्ष-किरण तपासण्या केल्या पण निदान काही झाले नाही. सरते शेवटी त्याला एका गावच्या परंपरागत वैद्याचा संदर्भ मिळाला. ते कोणतीही डोकेदुखी हमखास बरी करतात असे कळले. हा त्या वैद्यांना जाऊन भेटला. वैद्यांनी डोकेदुखीची व्यवस्थित माहिती घेतली आणि तो माणूस कामकाज काय करतो विचारले. तो माणूस सोनार होता हे कळल्यावर त्या वैद्यांनी स्वच्छ चाकूने कानशीला जवळ एक बारीक छेद केला आणि मेणयुक्त सोन्याचा काही मिलिग्रामचा कण काढला. त्यानंतर त्या माणसाला कधीच डोकेदुखीचा त्रास झाला नाही.

झाले असे होते की वर्षानुवर्षे सोन्याचे दागिने बनवताना नाकावाटे सोन्याचे सूक्ष्म कण जाऊन ते त्या विशिष्ट ठिकाणी साचले होते. जे रोगनिदान शहरातील डॉक्टरांना तपासण्या करून कळले नाही ते एका अनुभवी वैद्याला कळले.