माझ्या कडून चूक झाली... मी वासुदेव पहिला आहे पण पोतराज नाही... मला पोतराज आणि वासुदेव एकाच वाटत होते... औरंगाबाद मध्ये... तमिळ भाषिक काही गायक/भिक्षुकी दरवर्षी येतात... आणि इतक्या सुंदर आवाजात मराठीत अभंग, भजन, कीर्तन म्हणतात कि बस कानाला मनाला खूप छान वाटते... जसे गायक हे करिअर होऊ शकते तसे अभाग कीर्तन गाणारे असे का करिअर होऊ शकत नाही... मी हे सगळे प्रातिनिधिक घेतले होते ... जाता जाता आईने व बाबांनी अशातच य.च.मुक्त.वि. चा योग डिप्लोमा केला... त्यातील एक पुस्तक हातात लागले... पहिल्याच पानावर... 



मुळ मुद्दा असा आहे कि
१. आपणास सर्व भारतीय परंपरा माहित आहेत काय ?
२. त्यातील समृद्ध, चांगल्या, टाकाऊ कशा ठरवायच्या ? कोणते परिमाण लावायचे .. का फक्त विज्ञान आणि तर्क ?
३. त्या टिकवण्यासाठी काय करता येईल ?
४. सरकार नावाची अजस्त्र यंत्रणा काही करते का ?
५. त्या आपले जीवने ध्येय असू शकतात का (जसे डॉ., engg) असते तसे.. ?

काही सापडले.. दुवा क्र. १