कुठलीही भाषा आपल्याला शुद्ध रूपात बोलता यायला हवी अशी अपेक्षाच गैर होऊ लागलेली आहे असे वाटते. 'मराठी भाषेत लिहिलेल्या व किमान एक वाक्य लिखित असलेल्या अभिनंदनपर बोर्डात किमान एक शुद्धलेखनाची चूक असते' असे नवीन कंजेक्चर मांडावे काय असा विचार मनात येतो. या पार्श्वभूमीवर नारळीकरांचे आत्मचरित्र हा एक सुखद (आणि कधीकधी किंचित क्लिष्ट) धक्का आहे.
किंचित अवांतर : 'तरस खाण्या'बद्दल मनोगतींचे काय विचार आहेत ?