या निमित्ताने मराठी आणि संस्कृतोद्भव सर्वच भाषा संस्कृतच्या कुबड्या सदैव वापरून स्वतःची प्रगति करून घेऊ शकल्या नाहीत हे सत्य आपल्याला मान्य करावे लागेल.
मान्य. हेही काही अंशी मान्य की काही इंग्रजी शब्दांना  मराठी चपखल शब्द नसतील.
पण अवघडपणा तर इंग्रजी भाषेतही आहेच की. आणि तिचं मूळही इंग्रजी नसून लॅटीन आहे.मग इंग्रजीदेखील लॅटिनच्या कुबड्या घेऊनच जगभर वावरते आहे ना? प्रश्न,  कुबड्या घेऊन चालताय (कुबड्या म्हणजे मला इथं आधार असं म्हणायचंय... )की न घेता हा नाहीए.
पुढं जाता की नाही हा आहे. भाषा वापरणं महत्त्वाचं आहे ना! आपण मराठीवालेच जर तिला बोजड वगैरे समजून आणि कुबड्या घेऊन चालणारी भाषा असं जर हिणवून बोलू लागलो तर ती समृद्ध होणार कशी. त्यामुळं ती वापरणं महत्त्वाचं आणि कमीपणा न मानणं हेही तितकंच महत्त्वाचं.
साधं घ्या राव, संगणक ,जगात येउस्तोवर माऊस हा एक प्राणी असायचा, आता ती एक वस्तू झालीए. आता माऊस हा इंग्रजी शब्द, अर्थ उंदीर. पण मग इंग्रजीत हा समाविष्ट झाला ना, संगणकाचा एक भाग म्हणून. आपणही माऊसच म्हणतो.  मला म्हणायचं असं आहे, की इंग्रजीत नवीन आलेले शब्द कसेही असोत, आपण लगेच स्वीकारतो. पण मराठीत जुनेच शब्द, बोजड बोजड म्हणून वापरायचं टाळतो.
आणि कुणीतरी मूषक, कळफलक/कळपाट, मातृफलक वगैरे म्हटलं की हसतो. आता मदरबोर्ड ह्यात "मदर" कुठून आली? हे इंग्रजीला कुणी नाही विचारणार!!
स्पेलिंगचेच उदाहरण घ्या ना.
बट आणि पुट
डू आणि गो
सेल आणि कॉल (म्हणजे इंगजी सी हे स म्हणूनपण आणि क म्हणूनपण वापरतात. मराठीत/कन्नडमध्ये किमान तसं तरी नाही. )
केमिस्ट्री आणि चॉक
शिकणाऱ्याला इंग्रजीत तरी कुठं "लर्नर" किंवा "स्टडिअर" म्हणतात, स्टुडेंट असंच म्हणतात ना?
आणि अभियंता आणि इतर तत्सम शब्द बोजड का वाटावेत. वापरायला लागा म्हणजे त्यांचं तथाकथित वजन कमी होत जाईल.