मित्रांनो,
मराठीतील एका न्यूज चॅनेलवरील ब्रेकिंग न्यूजमधे उडत उडत पाहिले, (त्यामुळे
हवा तो नेमका संदर्भ सांगता येत नाही. पण उद्याच्या पेपरातून ही बातमी
सविस्तर येईल त्यातून योग्य तो खुलासा होईल अशी अपेक्षा आहे.) की लातूरात
एका बाबाने (तो ही नेमका मुस्लिम समाजातील असल्याने) काळ्या जादूचे प्रयोग
करून बनवल्याचे व नंतर पैसे उकळायचे प्रकार केल्याने त्याच समाजातील एका
महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांची कशी प्रतिक्रिया होते व या कायद्याच्या
आधारे फक्त हिंदूंना नाडले जाणार आहे अशी हाकाटी केली जाते ती कितपत खरी
त्यावरही प्रकाश पडेल व त्या पीडित महिलेला कसा व किती शीघ्र न्याय मिळतो व
अशा प्रकारांना बंदोबस्त करायला या तरतुदी कशा हातभार लावतात यांची कसोटी
लागणार आहे.