सणांच्या निर्मितीमागचे ऐतिहासिक महत्त्व विशद करणारे पुराणशास्त्री काहीही
म्हणोत, परंतु शेतीमधल्या मिळकतीचा संचय शेतकर्याच्या घरात होताच कामा
नये, शेतकरी कायमच कर्जबाजारी राहावा हा उद्देश स्पष्टपणे डोळ्यासमोर
ठेवूनच सणांची निर्मिती आणि रीतिरिवाज अगदी प्राचीन काळापासून
नियोजनबद्धरितीने आखल्या गेले आहे, हे उघड आहे.
हे कोणी आखले आहे असे तुम्हाला सुचवायचे आहे.
काही प्रश्नः
सण कसे साजरे करावेत हे शेतकरी स्वतः का ठरवत नाहीत?
नागपंचमीला करंज्या, लाडू, चकल्या करतात ही गोष्ट मला नवीन आहे. नागपंचमीला पुरणाची दिंडे करतात. करंज्या, लाडू इत्यादी दिवाळीत करतात अशी माझी माहिती आहे.
राखीपौर्णिमा हा सण महाराष्ट्रात साजरा करणे हे प्राचीन काळापासून चालत आलेले नाही, ही अगदी अलीकडची गोष्ट आहे.
गोकुळ अष्टमी च्या सणाला घरोघर गोडधोड करतात?
भोंडला, हादगा, कोजागिरी ह्या 'सणां'साठी काय खर्च केला जातो? भोंडला मुली घालतात. भोंडल्याला आलेल्या मुलींना चमचाचमचा खिरापत दिली जाते. कोजागिरीला दूध आटवतात, इतकेच.
असो. एकूणच लेख एकांगी आहे.
अशीही बरीच उदाहरणे ऐकिवात आहेत की शेतीसाठी मिळालेल्या कर्जातून शेतकऱ्याने ऐपत नसतानाही मुलीचे लग्न थाटामाटात केले. कारण लग्न साधेपणाने केले तर समाज काय म्हणेल?
शेतकऱ्यांचे प्रबोधन करून त्यांच्या मनावर ऋण काढून सण करू नये हे बिंबवायला पाहिजे, त्यांची मानसिकता बदलायला पाहिजे. तरच परिस्थितीत बदल होईल. विनाकारण कोणावर तरी त्याचे खापर फोडणे चूक आहे.