चुकीच्या शब्दोच्चाराचे समर्थन करताना 'भाषा हे माध्यम ही विचारांचे आदान प्रदान व्हावे म्हणून असते. मी काय बोलतो आहे ते इतरांना समजले नं? मग झाले तर.' असा युक्तिवाद केला जातो.
मुळात शुद्धतेची आवड असावी लागते. सुरुवात भाषेपासून केली आणि ती आवड जोपासली की आचरणातही शुद्धता आपोआप येते. शुद्ध दुध, शुद्ध तुप, शुद्ध आणि साफ धान्य आवडतं नं? त्यासाठी अट्टाहास असतो तर भाषेच्या शुद्धतेबद्दल का नाही?
रूमाल, बाजार हे मुळ अरबी शब्द आहेत.
तसेच मैदान, फत्ते (विजय), दुकान, मालक, इमारत, वजीर असे अनेक शब्द अरबीने उर्दूला आणि उर्दूने मराठीला बहाल केले आहेत.