धन्यवाद महेश,

 'थाली' म्हणजे थाळी, ताट, परात. मूळ संस्कृत शब्द 'स्थाली'.

पण मूळ संस्कृत शब्द 'स्थाली' असा असताना मराठीत तो 'थाळी' असा का झाला असावा? अपभ्रंश होताना सहसा मूळ शब्दापेक्षा उच्चारायला सोपा असा उच्चार वापरात येतो. 'ल' हा 'ळ' पेक्षा उच्चारायला सोपा असताना मराठीत 'थाळी' असा शब्द का रुजला असावा?