देव हा माणसानं शोधलेला सर्वात मोठा आणि व्यापक टाईमपास आहे. रोज पूजा-अर्चा करणं, वेगवेगळे उपास, सत्यानारायण किंवा तत्सम व्रतवैकल्य, देवळाबाहेर रांगा लावणं, तीर्थक्षेत्र पर्यटन असे तदनुषंगिक समाजमान्य टाईमपास आहेत.
वारी हा महाराष्ट्राच्या लक्षावधी रिकामा वेळ असलेल्या लोकांचा भव्य सामूहिक टिपी आहे.
तारुण्यात पारस्पारिक आकर्षण ही प्रमुख ओढ असते. जर तरुण मुली वारी करायला लागल्या तर आपसूक मुलांची संख्या वाढेल.
साहस हे  तारुण्यात आणखी एक आकर्षण असतं. मैलोनमैल पायपीट हा त्याचा एक भाग ठरू शकतो.
सध्याची वारीची अवस्था पाहता (अस्वछता, खाण्यापिण्याची आबाळ, मुलींचा नगण्य सहभाग) पाहता भविष्यात  तरूणाई वारीकडे आकर्षित होण्याची शक्यता कमी.